Testimonials by children

तो एक दिवस

तो दिवस कसा विसरू मी? आयुष्य बदलून टाकणारा…

आई का रडते आहे? माझा रक्ताचा नमुना आणि काही कागद पत्र हातात घेवून डॉक्टर काहीतरी समजावत आहेत…मी बाबाांना शोधू लागलो….  हात जोडून असलेला बाबा पाहून मी रडायला लागलो…डॉक्टरांनी मला बोलावून सांगितले कि मला ‘डायबेटीस’ झाला आहे. शब्दावरून मला काहीच कळले नाही…मी  विचारले ‘मी बारा होईन ना?’ ते म्हणाले ‘हो! फक्त तुला दिवसातून चार वेळा इंजेक्शन घ्यावे लागेल.’

माझे आयुष्य बदलले… नावापुढे ‘पेशंट’ शब्द जोडला गेला…

आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी आई बाबा रात्रंदिवस कष्ट करत होते…
अशातच देवाची कृपा म्हणून नित्याशा या संस्थेबद्दल माहिती कळली…

माझे आयुष्य पुन्हा एकदा बदलले… नित्याशा मधील डॉक्टर आणि कार्यकर्त्यांमुळे डायबेटीस माझा मित्र झाला…

माझा अनुभव वाचण्यासाठी इथे क्लिक करा …

Click on the thumbnails below to read more such experiences…